बुधवार, २७ फेब्रुवारी, २०१९

आज मराठी राजभाषा दिन!!!!

मायबोलीसाठी काहीतरी

आज मराठी राजभाषा दिन!!!!

🌹🌹🌹🌹🌹
°°¶¶°°शोधावया भाकरीला निघाली
ती भूक आहे...°°¶¶°°
°°¶¶°°जन्मताच गरीबी येते
ही कुणाची चूक आहे...°°¶¶°°
°°¶¶°°भूक लागली की खाणे
ही प्रकृती आहे...°°¶¶°°
°°¶¶°°भूक नसतांना खाणे
ही विकृती आहे...°°¶¶°°
°°¶¶°°घासातील घास
दुसऱ्याला देणे ही
मराठी माणसाची
संस्कृती आहे°°¶¶°°🍃

🍀!! मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!🍀
🌹🌹🌹🌹


अनेक मराठी बंधु भगिनींनी आपल्या मराठी जनांना शुभेच्छांचे
शुभ संदेश समाजमाध्यमांतर्फे पाठवले पण आपण ज्या भ्रमणध्वनी संचाच२ उपयोग
करून संदेश पाठवले त्या भ्रमणध्वनी संचाची भाषा मात्र इंग्रजी,ज्या
प्रणालीचा वापर केला त्या प्रणालीची भाषा सुद्धा इंग्रजीच ,याचा अर्थ असा
होतो की मराठी ही फक्त आपण एक दिवस साजरा करण्यापुरतीच मर्यादित ठेवली
आहे.बाळासाहेब ठाकरेंनी ज्यावेळी स्थानिकांच्या प्रश्नांबद्दल आवाज उठवला
त्या वेळेस ते म्ह़णायचे "तुमच्या घरातील भांडी घासणारी बा़ई सुद्धा
मराठीच पाहिजे" एव्हढी अपेक्षा मी तुमच्याकडुन करत नाही मात्र निदान आपली
अस्मिता टिकवण्यासा़ठी भ्रमणध्वनीपासुन ते मिठाईच्या दुकानापर्यंत
मरा़ठीचा वापर व्हाढवा, प्रत्येक परकीय भाषेतील शब्दाला मराठी शब्द
शोधण्याचा त्रास घेतला तर नक्कीच आपली मराठी वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचेल
याची १००% खात्री आहे
#मायबोलीमराठी
#अभिजात मराठी
#आंरराष्ट्रीय मराठी

मंगळवार, १९ फेब्रुवारी, २०१९

आज १९ फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती

अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान
श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराजांना 
त्रिवार मानाचा मुजरा. 



शिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला... 
सनई-चौघडे वाजू लागले... 
सारे आनंदी-आनंदी वातावरण पसरले... 
भगवा अभिमानाने फडकू लागला... 
सह्याद्री आकाशाच्या उंचीने दिल्लीकडे ताठ नजरेने पाहू लागली... 
अवघा दक्खन मंगलमय झाला.. 
अन एक आरोळी सह्याद्रीच्या कडेकोपर्यात घुमली 
"अरे माझा राजा जन्मला... 
माझा शिवबा जन्मला ... 
दीन-दलितांचा कैवारी जन्माला... 
दृष्टांचा संहारी जन्मला... 
अरे माझा राजा जन्मला...
शिवजयंतीच्या सर्वांना मनपुर्वक हार्दिक शुभेच्छा ...!

=======================================================

१४ फेब्रुवारी २०१९   निषेध !                                       निषेध !                                                 निषेध !

            पुलवाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर 40 जवान शहीद झाले दुःखाची गोष्ट ही की आजून काही जवान मृत्यू ला झुंज देत आहेत
त्यांच्या साठी देवाकडे प्रार्थना करा येवढीच विनंती करतो
आणि शहीद जवानांना श्रद्धांजली