मुख्याध्यापक हे शाळेचा आरसा असतात .शैक्षणिक विकासाबरोबर राष्ट्रीय विकासात देखील शिक्षकांचा सहभाग असतो.म्हणूनच शिक्षकांना राष्ट्राचे आधारस्तंभ म्हणून ओळखले जाते.शाळा,समाज,पाल्य,पालक,संस्थापक,यांना जोडणारा दुवा म्हणजेच मुख्याध्यापक होय. असेच आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री.देशमुख सर यांच्या कार्याची चुणूक पाहुन संपुर्ण महाराष्ट्र राज्य स्वराज्य संघ आयोजित"आदर्श शिक्षक"पुरस्काने सन्मानीत करण्यात आला .हा पुरस्कार राज्याचे माजी उपमुख्यमंत्री पु.जि.शि.मं.संस्थेचे अध्यक्ष ना.अजितराव पवारसो. यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .
पुरस्कार वितरण सोहळा