शनिवार, २६ जानेवारी, २०१९

भैरवनाथ विद्यालयांमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडा वंदन

         करडे येथे की भैरवनाथ विद्यालयांमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडा वंदन गावचे प्रथम नागरिक विद्यमान सरपंच श्री सुनील चंद्रकांत इसवे यांच्या हस्ते  करण्यात आले .
   आज प्रजासत्ताक दिन असल्यामुळे गावच्या शाळेतील विद्यार्थ्यांना सकाळी सात वाजता प्रभात फेरी काढली त्याचबरोबर तलाठी कार्यालयासमोर झेंडावंदन करण्यात आले तसेच ग्रामपंचायत कार्यालयासमोर झेंडावंदन करण्यात आले, त्याचबरोबर भैरवनाथ विद्यालयातही झेंडावंदन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे सरपंच सुनील चंद्रकांत इसवे  हे होते त्याचबरोबर करडे गावचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य माननीय राजेंद्र रणजीत जगदाळे, उपसरपंच गणेश दादा रोडे तसेच ग्रामपंचायत सदस्य व व जिल्हा परिषद शिक्षक वृंद, विविध क्षेत्रात काम करणारे पदाधिकारी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते,
    यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे यांनी बोलताना शाळेला मदत करणाऱ्या मान्यवरांचे आभार मानले त्याच बरोबर माननीय राजेंद्र भाऊ जासूद यांच्याकडून शाळेसाठी पूर्व दिशेला जीना व गेट देण्यात आले आहे असे  आश्वासन त्यांनी दिले   त्यानंतर अध्यक्षीय भाषण झाले व गावातील विविध शाळांची सांस्कृतिक कार्यक्रम झाले, व त्यानंतर मुलांना खाऊ वाटप झाला
                                                ( फोटो सौजन्य किरण श्रीमंत)
                                           




                                                             आणखी फोटो पहा >>