मंगळवार, १२ नोव्हेंबर, २०१९

करडे गाव चे आराध्य दैवत श्री भैरवनाथ देवाचा उत्सव आज कार्तिक पौर्णिमा

              सालाबादप्रमाणे करडे गाव चे कुलदैवत श्री भैरवनाथ देवाचा उत्सव कार्तिक पौर्णिमा १९४१,मंगळवार
दि.१२/११/२०१९ ते १४/११/२०१९ या कालावधीत साजरा करण्यात येत आहे यावेळी ग्रामस्थांच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

  • मंगळवार

१)पहाटे ५ वाजता भैरवनाथ देवाची महापूजा,
२) दुपारी ११ ते ४ ह भ प गोदावरीताई मुंडे (गंगाखेड ) यांच्या अभंगचा कार्यक्रम,
३)सायंकाळी ७ ते ८ दंडवत आणि शेरणी वाटप कार्यक्रम 
४)रात्री ९ वाजता देवाच्या पालखीची मिरवणूक
५) रात्री १० वाजता रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर यांचा लोकनाट्य तमाशा

  • बुधवार 

६) रोजी सकाळी १० वाजता रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर यांचा हजेरीचा कार्यक्रम
७)दुपारी २ ते ६ वाजेपर्यंत जंगी कुस्त्यांचा आखाडा  (एकूण इनाम ५,५५,५५५ रुपये )
(टीप . सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत पैलवांची वजने घेतली जातील आधार कार्ड ,पॅन कार्ड मतदान कार्ड यापैकी एक पुरावा आवश्यक )
८)रात्री १० वाजता वैभव म्युझिकल नाईट कोल्हापूर यांचा ऑर्केष्ट्राचा कार्यक्रम होणार असल्याचे यात्रा कमिटीच्या वतीने सांगण्यात आले.

  • गुरुवार 
१) महिलांसाठी खास महिला बाजार 
वरील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून परिसरात स्वच्छता राखन्यास सांगितली आहे ,यात्रा उत्सवाला कुठलेही गलगोट लागू नये व यात्रा शांततेत पार पडावी यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे