रविवार, १६ डिसेंबर, २०१८

श्री भैरवनाथ विद्यालय करडे येथे सकाळ बालकुमार चित्रकला स्पर्धा

          श्री भैरवनाथ विद्यालय करडे येथे सकाळ बालकुमार चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.सदर सकाळ बालकुमार चित्रकला स्पर्धेसाठी चालू वर्षी नवीन केंद्र म्हणून परवानगी देण्यात आली. स्पर्धा केंद्र उद्घाटन विद्यालयाचे प्राचार्य श्री.सुभाष देशमुख यांनी केले.सरस्वती प्रतिमेचे पूजन करण्यात आले.विद्यालयाचे कलाशिक्षक श्री.संतोष शितोळे यांनी सदर स्पर्धेची माहिती दिली.व रूपरेषा स्पष्ट केली.सदर स्पर्धा नियोजनासाठी सौ.सुरेखा शितोळे,श्री.मयुर ओतारी,श्री.मिलिंद ढवळे,श्री.संजय रोडे,श्री.योगेन्द्र बांदल ,श्री.आडसुरे यांनी सहभाग घेतला. स्पर्धेत करडे हायस्कूल, जि.प.प्रा. शाळा,तळवाडी या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.एकण ४८१  स्पर्धकांनी सहभाग घेतला.स्पर्धा आनंदी वातावरणात पार पडली..