मंगळवार, १२ नोव्हेंबर, २०१९

करडे गाव चे आराध्य दैवत श्री भैरवनाथ देवाचा उत्सव आज कार्तिक पौर्णिमा

              सालाबादप्रमाणे करडे गाव चे कुलदैवत श्री भैरवनाथ देवाचा उत्सव कार्तिक पौर्णिमा १९४१,मंगळवार
दि.१२/११/२०१९ ते १४/११/२०१९ या कालावधीत साजरा करण्यात येत आहे यावेळी ग्रामस्थांच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

  • मंगळवार

१)पहाटे ५ वाजता भैरवनाथ देवाची महापूजा,
२) दुपारी ११ ते ४ ह भ प गोदावरीताई मुंडे (गंगाखेड ) यांच्या अभंगचा कार्यक्रम,
३)सायंकाळी ७ ते ८ दंडवत आणि शेरणी वाटप कार्यक्रम 
४)रात्री ९ वाजता देवाच्या पालखीची मिरवणूक
५) रात्री १० वाजता रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर यांचा लोकनाट्य तमाशा

  • बुधवार 

६) रोजी सकाळी १० वाजता रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर यांचा हजेरीचा कार्यक्रम
७)दुपारी २ ते ६ वाजेपर्यंत जंगी कुस्त्यांचा आखाडा  (एकूण इनाम ५,५५,५५५ रुपये )
(टीप . सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत पैलवांची वजने घेतली जातील आधार कार्ड ,पॅन कार्ड मतदान कार्ड यापैकी एक पुरावा आवश्यक )
८)रात्री १० वाजता वैभव म्युझिकल नाईट कोल्हापूर यांचा ऑर्केष्ट्राचा कार्यक्रम होणार असल्याचे यात्रा कमिटीच्या वतीने सांगण्यात आले.

  • गुरुवार 
१) महिलांसाठी खास महिला बाजार 
वरील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून परिसरात स्वच्छता राखन्यास सांगितली आहे ,यात्रा उत्सवाला कुठलेही गलगोट लागू नये व यात्रा शांततेत पार पडावी यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे 

गुरुवार, २४ ऑक्टोबर, २०१९

विधानसभा निवडणूक २०१९

शिरुर हवेली विधानसभा मतदारसंघात  राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉग्रेस आघाडीचे उमेदवार माजी आमदार अशोक पवार
यांचा २९०६२ मतांनी विजयी












यावेळी कार्यकर्त्यांनी कुकडी वसाहत येथे गर्दी केली होती.

गुरुवार, १५ ऑगस्ट, २०१९

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..




  १५ ऑगस्ट २०१९ करडे ,

                    सर्व भारतवासियांना ७3  व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.. 
               आपल्या महान आणि विशाल भारत देशाचा अभिमान बाळगा , संघटित व्हा..
Flying BatFlying Bat Flying Bat


शनिवार, ६ एप्रिल, २०१९

*नवीन वर्ष आपणांस व आपल्या कुटुंबियास सुख-समृध्दीचे,* 
 *भरभराटीचे आणि आनंदमय जावो हि सदिच्छा..* 
 *येणाऱ्या काळात आपण अधिक यशस्वी होवो हि शुभेच्छा..* 
🍀🍀🌺🌺🌿🌿
 *मराठी नववर्षाच्या व गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा* 
🍀🍀🌺🌺🌿🌿

बुधवार, २० मार्च, २०१९

करडे गावची होळी...!

होळी पेटवताना टिपलेली काही छायाचित्रे ----
#holifestival

सोमवार, ११ मार्च, २०१९

श्री भैरवनाथ यात्रेचा व्हिडिओ प्रसिद्ध

       गावचे  फोटोग्राफर शुभम जगदाळे यांनी आपल्या श्री भैरवनाथ देवाचा उत्सवाचा अतिशय सुंदर असा विडिओ बनवला आहे..    नक्की पहा आणि like करा , comments करा, आणि subscribe करा

brframeborder="0" allow="accelerometer; autoplay; encrypted-media; gyroscope; pic />

गुरुवार, ७ मार्च, २०१९

'गुरुकृपा व्हेज' या फॅमिली रेस्टॉरंट च्या उदघाटन प्रसंगी

करडे गावातील युवा उद्योजक प्रवीण वाळके आणि गणेश वाघमारे यांच्या 'गुरुकृपा व्हेज' या फॅमिली रेस्टॉरंट च्या उदघाटन प्रसंगी मा.नामदार माजी उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब ,डाॅ  अमोल कोल्हे , मा. प्रदिपदादा विद्याधर कंद व पंचक्रोशीतील मान्यवर हे उपस्थिति होते ,अभिनेत्री सायली पाटील यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली ,यावेळी ऑर्केस्ट्रा चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
          सर्व अत्याधुनिक फर्निचर व सुविधांयुक्त हे हॉटेल आहे, याठिकाणी फॅमिली साठी उत्तम सोय करण्यात आली आहे ,वाढदिवस व फॅमिली पार्टी साठी स्वतंत्र सोय करण्यात आली आहे
प्रत्येकाने एक वेळ भेट दयावे असे हे हॉटेल आहे.

बुधवार, २७ फेब्रुवारी, २०१९

आज मराठी राजभाषा दिन!!!!

मायबोलीसाठी काहीतरी

आज मराठी राजभाषा दिन!!!!

🌹🌹🌹🌹🌹
°°¶¶°°शोधावया भाकरीला निघाली
ती भूक आहे...°°¶¶°°
°°¶¶°°जन्मताच गरीबी येते
ही कुणाची चूक आहे...°°¶¶°°
°°¶¶°°भूक लागली की खाणे
ही प्रकृती आहे...°°¶¶°°
°°¶¶°°भूक नसतांना खाणे
ही विकृती आहे...°°¶¶°°
°°¶¶°°घासातील घास
दुसऱ्याला देणे ही
मराठी माणसाची
संस्कृती आहे°°¶¶°°🍃

🍀!! मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!🍀
🌹🌹🌹🌹


अनेक मराठी बंधु भगिनींनी आपल्या मराठी जनांना शुभेच्छांचे
शुभ संदेश समाजमाध्यमांतर्फे पाठवले पण आपण ज्या भ्रमणध्वनी संचाच२ उपयोग
करून संदेश पाठवले त्या भ्रमणध्वनी संचाची भाषा मात्र इंग्रजी,ज्या
प्रणालीचा वापर केला त्या प्रणालीची भाषा सुद्धा इंग्रजीच ,याचा अर्थ असा
होतो की मराठी ही फक्त आपण एक दिवस साजरा करण्यापुरतीच मर्यादित ठेवली
आहे.बाळासाहेब ठाकरेंनी ज्यावेळी स्थानिकांच्या प्रश्नांबद्दल आवाज उठवला
त्या वेळेस ते म्ह़णायचे "तुमच्या घरातील भांडी घासणारी बा़ई सुद्धा
मराठीच पाहिजे" एव्हढी अपेक्षा मी तुमच्याकडुन करत नाही मात्र निदान आपली
अस्मिता टिकवण्यासा़ठी भ्रमणध्वनीपासुन ते मिठाईच्या दुकानापर्यंत
मरा़ठीचा वापर व्हाढवा, प्रत्येक परकीय भाषेतील शब्दाला मराठी शब्द
शोधण्याचा त्रास घेतला तर नक्कीच आपली मराठी वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचेल
याची १००% खात्री आहे
#मायबोलीमराठी
#अभिजात मराठी
#आंरराष्ट्रीय मराठी

मंगळवार, १९ फेब्रुवारी, २०१९

आज १९ फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती

अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान
श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराजांना 
त्रिवार मानाचा मुजरा. 



शिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला... 
सनई-चौघडे वाजू लागले... 
सारे आनंदी-आनंदी वातावरण पसरले... 
भगवा अभिमानाने फडकू लागला... 
सह्याद्री आकाशाच्या उंचीने दिल्लीकडे ताठ नजरेने पाहू लागली... 
अवघा दक्खन मंगलमय झाला.. 
अन एक आरोळी सह्याद्रीच्या कडेकोपर्यात घुमली 
"अरे माझा राजा जन्मला... 
माझा शिवबा जन्मला ... 
दीन-दलितांचा कैवारी जन्माला... 
दृष्टांचा संहारी जन्मला... 
अरे माझा राजा जन्मला...
शिवजयंतीच्या सर्वांना मनपुर्वक हार्दिक शुभेच्छा ...!

=======================================================

१४ फेब्रुवारी २०१९   निषेध !                                       निषेध !                                                 निषेध !

            पुलवाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर 40 जवान शहीद झाले दुःखाची गोष्ट ही की आजून काही जवान मृत्यू ला झुंज देत आहेत
त्यांच्या साठी देवाकडे प्रार्थना करा येवढीच विनंती करतो
आणि शहीद जवानांना श्रद्धांजली  

 


शनिवार, २६ जानेवारी, २०१९

भैरवनाथ विद्यालयांमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडा वंदन

         करडे येथे की भैरवनाथ विद्यालयांमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडा वंदन गावचे प्रथम नागरिक विद्यमान सरपंच श्री सुनील चंद्रकांत इसवे यांच्या हस्ते  करण्यात आले .
   आज प्रजासत्ताक दिन असल्यामुळे गावच्या शाळेतील विद्यार्थ्यांना सकाळी सात वाजता प्रभात फेरी काढली त्याचबरोबर तलाठी कार्यालयासमोर झेंडावंदन करण्यात आले तसेच ग्रामपंचायत कार्यालयासमोर झेंडावंदन करण्यात आले, त्याचबरोबर भैरवनाथ विद्यालयातही झेंडावंदन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे सरपंच सुनील चंद्रकांत इसवे  हे होते त्याचबरोबर करडे गावचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य माननीय राजेंद्र रणजीत जगदाळे, उपसरपंच गणेश दादा रोडे तसेच ग्रामपंचायत सदस्य व व जिल्हा परिषद शिक्षक वृंद, विविध क्षेत्रात काम करणारे पदाधिकारी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते,
    यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे यांनी बोलताना शाळेला मदत करणाऱ्या मान्यवरांचे आभार मानले त्याच बरोबर माननीय राजेंद्र भाऊ जासूद यांच्याकडून शाळेसाठी पूर्व दिशेला जीना व गेट देण्यात आले आहे असे  आश्वासन त्यांनी दिले   त्यानंतर अध्यक्षीय भाषण झाले व गावातील विविध शाळांची सांस्कृतिक कार्यक्रम झाले, व त्यानंतर मुलांना खाऊ वाटप झाला
                                                ( फोटो सौजन्य किरण श्रीमंत)
                                           




                                                             आणखी फोटो पहा >>

सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व जवानांना मानाचा मुजरा.

                 सर्वाँनी फक्त प्रजासत्ताक दिनीच एकत्र येवून आपली देशभक्ती न दाखवता इतर दिनी आपल्या गरीब बांधवांना जी होईल ती मदत करावी.
                 
                                                     ।। जय हिंद जय भारत.।।
Natural

बुधवार, २३ जानेवारी, २०१९

HBD

करडे गावचे सुपुत्र .....
*करडे गावचे मा.आदर्श सरपंच.*
करडे गावचे मा.आदर्श सरपंचपती.....
प्रसिद्ध उद्योगपती...
दानशूर व्यक्ती....
 मागील आठ दहा वर्षात करडे गावचा चेहरा मोहरा बदलवणारे..
विकासकामांचा धडाका लावणारे.
सर्वांना बरोबर घेवून चालणारे...
*विरोधकांबरोबरही मित्रत्वाचे संबंध ठेवणारे....*
शांत, संयमी,अभ्यासू,
जि.प.सदस्य मा.राजेंद्रजी जगदाळे पाटील यांना
*वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*
💐💐💐💐💐💐

शनिवार, १२ जानेवारी, २०१९

राजमाता जिजाऊ जयंती


⛳||जय जिजाऊ||⛳
जय_शिवराय जयोस्तु_मराठे…!
स्वराज्याच्या प्रेरिका राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसहेबांना मानाचा मुजरा…!