शनिवार, २६ जानेवारी, २०१९

भैरवनाथ विद्यालयांमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडा वंदन

         करडे येथे की भैरवनाथ विद्यालयांमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडा वंदन गावचे प्रथम नागरिक विद्यमान सरपंच श्री सुनील चंद्रकांत इसवे यांच्या हस्ते  करण्यात आले .
   आज प्रजासत्ताक दिन असल्यामुळे गावच्या शाळेतील विद्यार्थ्यांना सकाळी सात वाजता प्रभात फेरी काढली त्याचबरोबर तलाठी कार्यालयासमोर झेंडावंदन करण्यात आले तसेच ग्रामपंचायत कार्यालयासमोर झेंडावंदन करण्यात आले, त्याचबरोबर भैरवनाथ विद्यालयातही झेंडावंदन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे सरपंच सुनील चंद्रकांत इसवे  हे होते त्याचबरोबर करडे गावचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य माननीय राजेंद्र रणजीत जगदाळे, उपसरपंच गणेश दादा रोडे तसेच ग्रामपंचायत सदस्य व व जिल्हा परिषद शिक्षक वृंद, विविध क्षेत्रात काम करणारे पदाधिकारी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते,
    यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे यांनी बोलताना शाळेला मदत करणाऱ्या मान्यवरांचे आभार मानले त्याच बरोबर माननीय राजेंद्र भाऊ जासूद यांच्याकडून शाळेसाठी पूर्व दिशेला जीना व गेट देण्यात आले आहे असे  आश्वासन त्यांनी दिले   त्यानंतर अध्यक्षीय भाषण झाले व गावातील विविध शाळांची सांस्कृतिक कार्यक्रम झाले, व त्यानंतर मुलांना खाऊ वाटप झाला
                                                ( फोटो सौजन्य किरण श्रीमंत)
                                           




                                                             आणखी फोटो पहा >>

सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व जवानांना मानाचा मुजरा.

                 सर्वाँनी फक्त प्रजासत्ताक दिनीच एकत्र येवून आपली देशभक्ती न दाखवता इतर दिनी आपल्या गरीब बांधवांना जी होईल ती मदत करावी.
                 
                                                     ।। जय हिंद जय भारत.।।
Natural

बुधवार, २३ जानेवारी, २०१९

HBD

करडे गावचे सुपुत्र .....
*करडे गावचे मा.आदर्श सरपंच.*
करडे गावचे मा.आदर्श सरपंचपती.....
प्रसिद्ध उद्योगपती...
दानशूर व्यक्ती....
 मागील आठ दहा वर्षात करडे गावचा चेहरा मोहरा बदलवणारे..
विकासकामांचा धडाका लावणारे.
सर्वांना बरोबर घेवून चालणारे...
*विरोधकांबरोबरही मित्रत्वाचे संबंध ठेवणारे....*
शांत, संयमी,अभ्यासू,
जि.प.सदस्य मा.राजेंद्रजी जगदाळे पाटील यांना
*वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*
💐💐💐💐💐💐

शनिवार, १२ जानेवारी, २०१९

राजमाता जिजाऊ जयंती


⛳||जय जिजाऊ||⛳
जय_शिवराय जयोस्तु_मराठे…!
स्वराज्याच्या प्रेरिका राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसहेबांना मानाचा मुजरा…!