गुरुवार, २२ नोव्हेंबर, २०१८

करडे येथील श्री क्षेत्रपाल भैरवनाथ देवाची यात्रा

करडे येथील क्षेत्रपाल
श्री भैरवनाथ देवाच्या यात्रेत निमित्त करण्यात आलेली नयनरम्य विदुयत रोषणाई


 गावचे  फोटोग्राफर शुभम जगदाळे यांनी आपल्या श्री भैरवनाथ देवाचा उत्सवाचा अतिशय सुंदर असा विडिओ बनवला आहे.


सोमवार, १९ नोव्हेंबर, २०१८

श्री क्षेत्रपाल भैरवनाथ देवाचा महोत्सव

🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵
सालाबादप्रमाणे याही वर्षी करडे येथील क्षेत्रपाल
🌹श्री भैरवनाथ देवाचा महोत्सव🌹
22 नोव्हेंबर 2018 रोजी होत आहे तरी पुढील प्रमाणे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे तरी आपण आपल्या सह कुटुंबासमवेत उपस्थित राहून गावच्या यात्रे ची शोभा वाढवावी ही ग्रामस्थांच्या वतीने नम्र विनंती करण्यात येत आहे
🌺कार्यक्रम रूपरेषा खालील प्रमाणे🌺
🌹22 नोव्हेंबर 2018 रोजी
➡सकाळी पहाटे  5.30 वाजता श्रींची महापूजा
➡दुपारी 12 ते 4 भजन भजनकार पंडित बाळासाहेब  वाईकर आणि ग्रुप अहमदनगर
➡रात्री 8 ते 12 वाजता क्षेत्र पाल श्री भैरवनाथ देवाची पालखी
➡रात्री 10 वाजता रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर तमाशा

🌹23 नोव्हेंबर 2018 रोजी
➡23 नोव्हेंबर 2018 रोजीदुपारी 3 ते 6 वाजता  कुस्त्यांचा जंगी आखाडा एकूण इनाम 5,55,555
➡रात्री 9 .30वाजता चैत्रालीचा नाद नाय करायचा ऑर्केस्ट्रा
🌹कार्यक्रम होणार आहे🌹
🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵

शुक्रवार, ९ नोव्हेंबर, २०१८

ग्रामस्थांनी केली अनोख्या पद्धतीने दिवाळी साजरी

आज पारधी समाज्याची दिवाळी गोड व्हावी म्हणून गावातील तंटामुक्तीचे अध्यक्ष दत्तात्रय राजे देशमुख,वि.सो.संचालक अरूण जगदाळे,ग्रा.प.सदस्य सुभाष जगदाळे,भास्कर ईसवे यांनी सलग चौथ्या वर्षी मिठाई वाटप करण्यात आली.

करडे गावच्या यात्रा कमिटी निवडणूक



मंगळवार, ६ नोव्हेंबर, २०१८

रविवार, ४ नोव्हेंबर, २०१८

श्री.भैरवनाथ विद्यालय,करडे.या शाळेचे मुख्याध्यापक प्रा.श्री.एस.बी.देशमुख सर यांचा सत्कार समारंभ

             
          मुख्याध्यापक हे शाळेचा आरसा असतात .शैक्षणिक विकासाबरोबर राष्ट्रीय विकासात देखील शिक्षकांचा सहभाग असतो.म्हणूनच शिक्षकांना राष्ट्राचे आधारस्तंभ म्हणून ओळखले जाते.शाळा,समाज,पाल्य,पालक,संस्थापक,यांना जोडणारा दुवा म्हणजेच मुख्याध्यापक होय. असेच आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री.देशमुख सर यांच्या कार्याची चुणूक पाहुन संपुर्ण महाराष्ट्र राज्य स्वराज्य संघ आयोजित"आदर्श शिक्षक"पुरस्काने सन्मानीत करण्यात आला .हा पुरस्कार राज्याचे माजी उपमुख्यमंत्री पु.जि.शि.मं.संस्थेचे अध्यक्ष ना.अजितराव पवारसो. यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .
       पुरस्कार वितरण सोहळा

दीपावलीच्या शुभेच्छा!

सस्नेह नमस्कार,
दिपावलीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या,
साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही,
मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या
परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
हे नववर्ष आपणास आनंदी, भरभराटीचे,
प्रगतीचे, आरोग्यदायी जाओ ह्याच
मनोकामना…!

गुरुवार, १ नोव्हेंबर, २०१८

विक्रम जगदाळे यांचा नवीन youtube Channel

करडे गावातील चे सुपुत्र विक्रम जगदाळे यांनी इंग्रजी भाषा शिकवण्यासाठी नवीन youtube  Channel तयार केला आहे तरी एकदा अवश्य भेट द्या .