सोमवार, २२ ऑक्टोबर, २०१८

श्री भैरवनाथांची पालखी

श्री भैरवनाथांची पालखी 
      उद्यास सकाळी ठिक ९:३० मि. "बारवदरा " या ठिकाणी जाणार आहे,तरी सर्व करडे ग्रामस्थांनी आणि भाविक भक्तांनी पालखी सोहळ्यात सहभागी व्हावे .

शनिवार, २० ऑक्टोबर, २०१८

श्री दत्ताअण्णा वसंतराव हांडे देशमुख तंटामुक्ती अध्यक्ष पदी

श्री दत्ताअण्णा वसंतराव हांडे देशमुख (करडे,ता.शिरुर जि.पुणे)करडेगाव तंटामुक्ती अध्यक्ष पदी सर्वानुमते निवड झाल्याबददल हार्दिक अभिनंदन ,तसेच भावि राजकीय वाटचालीस लाखलाख शुभेच्छा.💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

शुक्रवार, १९ ऑक्टोबर, २०१८

विक्रांत_देशमुख ASP/DCP(अतिरीक्त पोलीस अधिक्षक) पदी पदोन्नती

करडे गावचे सुपुञ 
#विक्रांत_देशमुख DYSP(पोलीस उपअधिक्षक) यांची
ASP/DCP(अतिरीक्त पोलीस अधिक्षक)
पदी पदोन्नती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन💐💐💐

गुरुवार, १८ ऑक्टोबर, २०१८

दस-याच्या हार्दिक शुभेच्छा...

झेंडूची तोरणं आज लावा दारी,

सुखाचे किरण येवूद्या घरी

पूर्ण होवूद्या तुमच्या सर्व इच्छा

विजयादशमीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा…


smitcreation.com
       नवरात्री म्हणजेच नऊरात्री अंबेचा जागर झाल्यानंतर दहावा दिवस
असतो विजयादशमीचा. आश्विन शुद्ध दशमी हा दिवस विजयादशमी किंवा दसरा
म्हणून पाळला जातो. महाराष्ट्रात दस-याच्या दिवशी एकमेकांना सोने म्हणून
आपट्याची पाने दिली जातात. या दिवशी सीमोल्लंघन, आणि शस्त्रपूजन केले
जाते.

       सध्याच्या काळात तरुण पिढी तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाच्या
आहारी गेली आहे. स्मार्टफोन, फेसबुक, ट्वीटर या सारख्या सोशल मीडियाकडे
तरुण पिढी आकर्षित झालेली आहे. याच सोशल मीडियावर कुठलाही सण, वाढदिवस,
एखादी चांगली घडामोड झाल्यास शुभेच्छांचा वर्षाव सुरु होतो. तशाच प्रकारे
दस-याचेही मेसेजेस सध्या प्रचंड व्हायरल होत आहेत. असेच काही व्हायरल
झालेले मेसेजेस आम्ही तुमच्यासाठी घेवून आलो आहोत.

रविवार, १४ ऑक्टोबर, २०१८

स.न.वि.वि. 
सालाबादप्रमाणे या वर्षीही *जय अंबिका माता नवरात्र उत्सव मंडळ करडे* नवरात्र उत्सव साजरा करत आहे उत्सव म्हणजे फक्त मनोरंजन नाही तर आपणही समाजच काही देणं लागतो ही भावना मंडळाच्या प्रत्येक सदस्यांची आहे अर्धात हे सर्व करत असताना आपल्या सहभागाशिवाय हे करणं शक्य नाही 
 म्हणून या वर्षीही नेहमी प्रमाणे एक अभिनव उपक्रम म्हणजे *रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान* ही भावना मनामध्ये ठेऊन *जय अंबिका माता नवरात्र उत्सव मंडळ करडे* आणि *आनंदऋषी ब्लड बँक अहमदनगर* यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक १४/१०/२०१८ रोजी सकाळी 10 वाजता *ग्रामीण आरोग्य केंद्र करडे* येथे रक्तदान शिबिर होणार आहे तरी आपण सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी व रक्तदान करून सहकार्य करावे ही विनंती 

*आयोजक*
*जय अंबिका माता नवरात्र उत्सव मंडळ करडे*
*आनंद ऋषी ब्लड बँक अहमदनगर*

शनिवार, १३ ऑक्टोबर, २०१८

फोटो गॅलरीत

https://kardegaon.blogspot.com/p/blog-page_23.html?m=1

फोटो गॅलरीत  गावातील जुने नवे फोटो add करण्यासाठी
खालील whatsapp  क्रमांकवर  पाठवा किंवा
खालील दिलेलेला फोर्म भरा आणि फोटोबद्दल माहिती लिहायला विसरू नका.

शुक्रवार, १२ ऑक्टोबर, २०१८

शेतकरी संघटने तर्फे विशेष पत्रकारिता पुरस्कार

#### बाळासाहेब गायकवाड सर####
(पत्रकार दै.लोकमत)यांना शेतकरी संघटने तर्फे विशेष पत्रकारिता पुरस्कार मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!!!!!

मंगळवार, ९ ऑक्टोबर, २०१८

*📢 नवीन मतदार नोंदणी 📢*



दि.१ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर २०१८ या कालावधीत नवीन मतदार नोंदणी कार्यक्रम सुरू झाला आहे. तरी ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत वय वर्षे १८ पूर्ण होणाऱ्या नवीन मतदारांनी खालील कागदपत्रांसह जवळील मतदान केंद्र अथवा मतदान केंद्रस्तरिय अधिकारी ( B. L. O.) यांच्याकडे संपर्क साधावा.

*🛑नवीन मतदार नोंदणीसाठी कागदपत्रे*:
घरातील मुलगा / मुलगी यांच्या नाव नोंदणीसाठी कागदपत्रे
*१)* जन्म पुरावा-शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट
*२)* रहिवासी दाखला ग्रामसेवक / तलाठी यांचे सहीचा
*३)* आधार कार्ड झेरॉक्स
*४)* १ पासपोर्ट साईज फोटो
*५)* घरातील नात्यातील (आई, वडील, भाऊ, बहीण) यांपैकी एकाचे ज्यांचे नाव अगोदर मतदार यादीत समाविष्ठ असेल तर त्यांच्या मतदान ओळखपत्राची झेरॉक्स

*🛑घरातील सुनबाईचे नाव समाविष्ट करण्यासाठी कागदपत्रे*: 
*१)* जन्मतारीख पुरावा शाळा सोडल्याचा दाखला / बोनाफाईड सर्टिफिकेट.
*२)* रहिवासी दाखला ग्रामसेवक / तलाठी यांचा.
*३)* १ पासपोर्ट साईज फोटो.
*४)* माहेरच्या गावात मतदार यादीत नाव असेल तर ते नाव कमी केल्याचा दाखला.
*५)* माहेरच्या गावात मतदार यादीत नाव नसेल तर यादीत नाव नसल्याचा दाखला.
*६)* पतीचे मतदार ओळखपत्र झेरॉक्स.
*७)* असल्यास लग्नपत्रिका.

*🛑संपर्क* :
मतदान केंद्रस्तरीय अधिकारी ( B. L. O. )

*🛑टीप* : ३१ डिसेंबर २००० पूर्वीचा जन्म असलेले स्त्री व पुरुष मतदार यादीत नाव समाविष्ट क________________

सोमवार, ८ ऑक्टोबर, २०१८

बैलपोळाच्या हार्दिक शुभेच्छा ..!

     आपल्यासाठी सदैव #कष्ट करणार्या बैलांबद्दल #
कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी
हा सण साजरा करण्यात येतो.
         या दिवशी बैलांना कामापासुन आराम असतो.
दुपारी पुरणपोळीचे जेवण त्यांना दिलं जातं .
शेतकरी# बांधवांना बैलपोळा#
च्या हार्दिक शुभेच्छा ..




सोमवार, १ ऑक्टोबर, २०१८

पेपर विक्रेता झाला करडे गावचा सरपंच

              पेपरविक्रेता झाला गावचा सरपंच...(व्हिडिओ)
करडे,ता.३० सप्टेंबर २०१८(प्रतिनीधी) : शिरुर तालुक्यातील करडे गावात सर्वसामान्य कुटुंबातील सुनिल इसवे यांना मतदारांनी बहुमताने निवडुन दिले असुन यापुर्वीचा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. वाचा सविस्तर बातमी व व्हिडिओत पहा सरपंचांची प्रतिक्रिया निळयालिंक वर क्लिक करुन-
goo.gl/9wyhK6