मंगळवार, २८ एप्रिल, २०२०

करोना पाश्वभूमीलक्षात घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्र करडे व वंचित घटकातील लोकांना साबन, मास्क , हॅडवॉश देण्यात आले

'''         आज रोजी करडे येथे वंचित विकास संस्था खडाळा अहमदनगर व क्राय  आणि बजाज ऑटो , मुंबई यांच्या सहकार्याने प्राथमिक आरोग्य केंद्र करडे व वंचित घटकातील लोकांना संस्थेच्या माध्यमातून या लोकांना स्वच्छतेसाठी  साबन, मास्क , हॅडवॉश देण्यात आले जेने करून  प्राथमिक केंद्रात येणाऱ्या गरजु नागरिकांना याचा लाभ घेता येइल तसेच प्रत्तेक कुटुंबात खेळणी कीटचे सामान देऊन हा छोटासा प्रयत्न संस्थेच्या माध्यमातून करण्यात आला आहे.              तसेच करडे आंबळे चव्हाणवाडी  येथील आशा वोर्कर  सिस्टर  येथील सिस्टर आशा सुपरवायझर यांना  लिक्विडसोप, सॅनिटाईझर, स्कापॅ देण्यात आले कारण,  सध्या च्या कोरोना विषाणू च्या प्रादुर्भाव मुळे आशा व सिस्टर गावातील प्रत्येक कुटुंबात जाऊन त्यांना माहीती सांगत आहेत व बाहेरून आलेल्या लोकांची नोंद ठेवत आहेत म्हणून त्याच्या सेफ्टी साठी संस्थेच्या माध्यमातून हा प्रयत्न करण्यात आला आहे,
         तरी संस्थेचे संस्थापक व सचिव श्री राजेंद्र काळेसर संस्थेचे प्रकल्प समन्वयक नंदा साळवे मॅडम सुदीप पडवळ सर तसेच शिरूर तालुक्यातील समुदाय संघटक  जितेंद्र काळे व सेन्टर ऑफीस  स्टाफ़ व सीमा जाधव हे संस्थेच्या माध्यमातून कोरोनाच्या विरोधात लढा देण्यासाठी प्रयत्न करत आहे



बुधवार, ८ एप्रिल, २०२०

करोनो : गुणाकार चालू केलाय, लॉकडाऊन वाढतोय, माफ करा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


देशात कोरोना फोफावत चालला असून कोरोना बाधितांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. देशातील सर्वाधिक रूग्ण हे महाराष्ट्रात आहेत. #CoronavirusOutbreakindia #CoronavirusLockdown #CoronaVirusUpdates #coronavirusinindia

कर्फ्यू लागू झाल्यानंतर सकाळी दहा ते दुपारी बारा या दोन तासांच्या कालावधीत लोक गरज पडल्यास जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी बाहेर येऊ शकतील.

शुक्रवार, ३ एप्रिल, २०२०


रविवार, २९ मार्च, २०२०

'करोना ' ला रोखण्यासाठी आणखी काय उपाय करायला हवे ?

१. सतत हात स्वच्छ सनिटायझर ने धुवावे.
२. बाहेर जाताना मास्क लावावा.
३. शक्यतो बाहेर जाणे टाळावे.
४.  तीन पेक्षा जास्त दुसऱ्या व्यक्ती पासून अंतर ठेऊन राहावे.
५. आसपास स्वच्छता राखा.
६. स्वतः बरोबर कुटुंबाची ही काळजी घ्या.
७. कोरडा खोकला, कफ, ताप वगैरे जाणवत असल्यास लगेच हॉस्पिटल बरोबर संपर्क टाळावा.
https://www.who.int/emergencies/diseases/novel-coronavirus-2019
https://www.who.int/emergencies/diseases/novel-coronavirus-2019

शुक्रवार, २० मार्च, २०२०

रविवार, २६ जानेवारी, २०२०

प्रजासत्ताक दिनाच्या भारतीयांना हार्दिक शुभेच्छा...❤🇮🇳🚩


Natural

                 
                                                     ।। जय हिंद जय भारत.।।

              प्रथम प्रजासत्ताक दिन म्हणजे काय हेच माहिती करून घ्याला पाहिजे कारण अनेक जणांना प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्यदिन यातील फरक माहित नसतो.
            भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी २६ जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे. याला गणराज्य दिन असेही म्हटले जाते. भारताचे संविधान संविधान समितीने २६ नोव्हेंबर, इ.स. १९४९ रोजी स्वीकारले व २६ जानेवारी इ.स. १९५० रोजी पासून भारतीय संविधान अंमलात आले. जवाहरलाल नेहरू यांनी २६ जानेवारी इ.स. १९३० रोजी लाहोर अधिवेशनात तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची (स्वातंत्र्याची) घोषणा केली होती. त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला. या दिवशी देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे आरोहण होऊन त्याला वंदना दिली जाते. भारताचे राष्ट्रगीत म्हटले जाते आणि आदर व्यक्त केला जातो. 

          २८ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र भारताचे संविधान तयार करण्यासाठी मसूदा समिती स्थापना केली गेली. या समितीने संविधानाचा मसुदा तयार करून तो सभेपुढे ४ नोव्हेंबर १९४७ रोजी सादर केला. या सभेने सार्वजनिक चर्चेसाठी सभागृहात हा प्रस्ताव १६६ दिवसांसाठी खुला केला आणि २ वर्ष,११ महिने आणि १८ दिवसाच्या कालावधी नंतर समितीने हा मसुदा अंतिम केला. बरेचसे विचार विमर्श आणि सुधारणा केल्यानंतर समितीच्या ३०८ सद्स्यांनी दोन हस्तलिखित प्रती (हिंदी आणि इंग्रजी) २४ जानेवारी १९५० रोजी स्वाक्षरांकित केल्या. दोन दिवसानंतर हे भारताचे संविधान संपूर्ण राष्ट्रासाठी लागू करण्यात आले. भारताच्या संविधानाच्या निमित्ताने भारताचा प्रजासत्ताक दिन हा साजरा करण्यात येऊ लागला. 

          दर वर्षी २६ जानेवारी रोजी भारताच्या राजधानीत, म्हणजे नवी दिल्ली येथे, एक मोठे संचलन आयोजित केले जाते.हे संचलन रायसीना हिलपासून राष्ट्रपती भवनापर्यंत राजपथ मार्गाद्वारे जाते. संचलनाच्या अगोदर अनाम सैनिकांसाठी बनवले गेलेले स्मारक, अमर जवान ज्योती, येथे भारताचे पंतप्रधान पुष्पचक्र अर्पण करतात. भारतासाठी आपले प्राण अर्पण करणार्‍या वीर सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात येते. त्यानंतर पंतप्रधान राजपथाच्या मुख्य मंचावर जातात व आलेल्या पाहुण्यांना भेटतात. तितक्यात प्रमुख पाहुण्यांसोबत राष्ट्रपतींचे आगमन होते. राष्ट्रगीत सुरु होताच राष्ट्रपती ध्वजारोहण करतात व २१ तोफांची सलामी दिली जाते. त्यानंतर देशासाठी शौर्य गाजवलेल्या सैनिकांना राष्ट्रपतींच्या हस्ते अशोक चक्र आणि कीर्ती चक्र, हे मुख्य पुरस्कार देण्यात येतात. राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेली देशातील शूर बालके सजवलेल्या हत्तीवरून किंवा वाहनावरून या संचलनात सहभागी होतात.प्रमुख पाहुणे म्हणून परराष्ट्रीय राष्ट्राध्यक्षांना निमंत्रण दिले जाते. भारतीय फौजांचे (नौदल, पायदल, वायुसेना) वेगवेगळे सेनाविभाग, घोडदळ, पायदळ, तोफखाना आणि इतर अद्ययावत शस्त्रे/ क्षेपणास्त्रे (जसे पृथ्वी, अग्नी), रणगाडे समवेत संचलन करतात. भारताचे राष्ट्रपती या फौजांची मानवंदना स्वीकारतात. या संचलनाच्या सादरीकरणाची पूर्वतयारी विशेष काळजीपूर्वक आणि शिस्तीने केली जाते इतके या संचलनाचे महत्व आहे. नवी दिल्ली येथे होणार्‍या संचलनाप्रमाणेच भारतातील सर्व राज्यांतही एकेक संचलन होते. प्रत्येक राज्यात त्या त्या राज्याचे राज्यपाल फौजांची मानवंदना स्वीकारतात. 
 स्त्रोत …. विकिपीडिया